रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देणार – मुख्यमंत्री

मुंबई - रत्नागिरीत आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ होत आहे. त्यामुळे आता कोरोना विषयक चाचण्यांची गती वाढेल. याचा जिल्ह्यातील सर्वांना फायदा होणार आहे. आता येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे तर त्याचा प्रस्ताव करा ते देखील करु, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयोगशाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात १ कोटी ७ लाख रुपये खर्चाने प्रयोग शाळा उभारण्यात आली आहे, याचे उद्घाटन मंगळावारी झाले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्घाटन केले. ठाकरे कुटुंब आणि कोकण यांचे विशेष नाते सर्वांना माहिती आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होते आणि आज मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे सर्व महाराष्ट्रासाठी मी काम करीत आहे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये अशा स्वरुपाची प्रयोगशाळा उभारण्यास विशेष मंजुरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आणि त्यानंतर अवघ्या चौदा दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन ही अद्ययावत अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या यंत्रे आणि उपकरणे यासाठी ८० लाखांहून अधिक खर्च झाला असून बांधकामासाठी १५ लाखांचा खर्च झाला. अतिशय गतिमान पद्धतीने सुविधा निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे यावेळी अभिनंदन केले.कोव्हीड-१९ चे संकट सुरु झाले. त्यावेळी राज्यात केवळ दोन प्रयोगशाळा होत्या आता ही संख्या ८५ झाली आहे. संकटाचे रुपांतर संधीत केल्याने या सुविधा निर्माण झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget