मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटला आग

मुंबई - दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात आज संध्याकाळी भीषण आग लागली. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.मोठ्या प्रमाणात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत होते. अग्निशमन दलाच्या जवळपास १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास ही आग लागल्याचे कळते. त्याचवेळी अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. आग इतक्या भीषण स्वरुपाने पसरत गेली की आगीच्या विळख्यात मार्केटमधील अनेक दुकाने आली. मार्केटमध्ये असणाऱ्या चार गाळ्यांना ही आग लागली ज्यानंतर ती वेगाने परसरल्याचे म्हटले जात आहे.अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरु असून, त्यांना बऱ्याच अंशी यशही मिळाले आहे. या आगीत सौंदर्य प्रसाधने आणि स्टेशनरी साहित्याच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मुंबईतील गजबजलेल्या परिसरात असणाऱ्या या मार्केट परिसरात गुरुवारी तुलनेने गर्दी कमी होती. कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लकडाऊनच्या काळानंतर सुरु झालेल्या अनलॉकमध्ये हे ठिकाण पूर्वपदावर येत होते. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget