नाहीतर भांडवलदार देशाला विकत घेतील ; राहुल गांधींचा सरकारला इशारा

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अर्थव्यवस्था कमकुवत झाली असून सरकारकडून अर्थव्यवस्था सावरण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी सरकारला अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून इशारा दिला आहे. 'जर सरकारने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पैसे बाजारात सोडले नाही तर गरीबांचा जीव जाईल, मध्यमवर्ग हा नवा गरीब झालेला असेल आणि भांडवलदार देशाला विकत घेतील, असा इशारा राहुल गांधी यांनी ट्विटरवरून दिला आहे.
खासगी कंपन्यातून कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याच्या अहवालाचा राहुल गांधी यांनी हवाला दिला. प्रत्येक गरीबाच्या हातात तत्काळ १० हजार रुपये द्या, तसेच पुढील सहा महिने दरमहा ७ हजार ५०० रुपये त्यांना कोरोनाच्या काळात द्यावेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी सरकारकडे केली.लघु आणि मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी आर्थिक पॅकेज घोषित करण्याची मागणी त्यांनी केली. कोरोनामुळे लघु उद्योगांना तोटा झाला आहे. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी त्यांच्या हातात पैसे देण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.उद्योगधंद्याच्या उत्पादनाचा इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन (IIP) अहवालही सरकारने थांबून धरला आहे. एप्रिल महिन्याची उत्पादनाची आकडेवारी समोर आली नाही. कोरोनामुळे आधीच्या महिन्यांच्या आकडेवारीशी तुलना केली जाऊ शकत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget