प्रमोद सावंत यांच्या सरकारला पाठिंबा देणे हि सर्वात मोठी चूक - सरदेसाई

पणजी - मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंतर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देणे ही माझ्या राजकीय कारकिर्दीमधील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे आज गोव्याच्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी मी गोव्यातील जनतेची माफी मागतो. तसेच भाजपप्रणित राज्य सरकार हे असक्षम आणि बेजबाबदार असल्याचा आरोप गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई म्हणाले. दक्षिण गोवा जिल्ह्यातील फातोर्डा मतदारसंघात जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.
पुढील काळात असे सरकार स्थापन करण्यासाठी मदत करणार नाही. पर्रीकर यांच्या मृत्यनंतरच आमच्यासाठी भाजप संपले होते. आम्ही भविष्यात गोव्यामध्ये भाजपला कधीही सरकार स्थापन करू देणार नाही, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच भविष्यात गोवा फॉरवर्ड पक्ष सरकारला चांगले कायदे करण्यासाठी मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.
गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. मात्र, भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांनी राज्यात परतून गोवा फॉरवर्ड पक्ष, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि काही अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. गेल्या वर्षी पर्रीकर यांचा मृत्यू झाल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाने प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये काँग्रेसमधील १० नेते भाजपमध्ये गेल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरदेसाई आणि अन्य दोन नेत्यांना मंत्रिमंडळातून काढले होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget