पँगाँग तलाव क्षेत्रात भारत-चीनचे सैनिक आमने-सामने

लडाख - पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये आज दुसऱ्या फेरीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीआधी चारपैकी तीन ठिकाणाहून भारत आणि चीन दोघांनी आपआपल्या सैन्य तुकडया थोडया मागे घेतल्या आहेत. या चार ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत.बैठकीआधी परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. शनिवारी लेफ्टनंट जनरल स्तरावर पहिली बैठक झाली होती. त्यावेळी सुद्धा दोन्ही देशांचे सैन्य थोडे मागे हटले होते. तीन ठिकाणाहून सैन्य मागे घेतले असले तरी पँगाँग टीएसओ तलावाच्या उत्तरेला दोन्ही देशातील सैनिक आमने - सामने आहेत . हाच भाग संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. दोन्ही बाजूंकडून तिथे कुठलीही हालचाल झालेली नाही.मे महिन्यापासून भारतीय सैन्याची गस्त बंद करण्यासाठी चिनी सैन्याने फिंगर ४ टू फिंगर ८ या भागावर नियंत्रण मिळवले आहे. ६ जून रोजी झालेली चर्चा आणि पुढील काही दिवसांत होणारी चर्चा लक्षात घेत चीनने गालवान व्हॅली, पीपी-१५ आणि हॉट स्प्रिंग्स येथून आपलं सैन्य दोन ते अडीच किमी मागे घेतलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चीनने सैन्य मागे घेतले असल्याने भारतानेही आपले काही सैन्य आणि वाहने या परिसरांमधून मागे हटवली आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget