मुंबईतील डबेवाल्यांना अस्लम शेख यांच्या हस्ते रेशन किटचे वितरण

मुंबई - सध्या देशभरात कोरोनाचे संकट घोंघावत आहे.लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेचे हाल झाले असून त्यांची आर्थिक स्थिती अगदी बिकट झाली आहे.शिवाय लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांनाही मोठा फटका बसला आहे. याबाबत डब्बेबाल्यांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी मुंबई शहतचे पालकमंत्री अस्लम शेख यांची डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी डबेवाल्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवीन, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. तसेच यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी डबेवाल्यांना २,५०० रेशन किटचे वितरण करण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या पी- उत्तर विभागाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रमेश करोंदे, सहाय्यक प्रवक्ता विनोद शेटे,मेक अर्थ ग्रीन अगेन मेगा फाऊंडेशनच्या अनुशा श्रीनिवासन अय्यर व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डबेवाले हे मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहेत. डबेवाले १३० वर्षांपासून प्रामाणिकपणे व सचोटीने कार्यालयांमध्ये वेळेवर जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करीत आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत डबेवाल्यांच्या रेशनची व्यवस्था करण्याची व डबेवाल्यांचे सर्व प्रश्न येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची ग्वाही पालखमंत्री शेख यांनी यावेळी दिली. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget