पालकमंत्र्यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना मदतीचे धनादेश सुपूर्द

रायगड - रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी दौरा केला होता. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पाहणी दौरा करुन मुख्यमंत्र्यांना पत्रही सादर केले होते.
निसर्ग चक्रीवादळात शेतकरी, बागायतदार तसेच सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायतीतील नुकसानग्रस्तांना १ लाख ३५ हजार रुपयांचे मदतीचे तसेच रोहा तालुक्यातील नागोठणे ग्रामपंचायतीतील नुकसानग्रस्त यशवंत नारायण मढवी - निडी तर्फे नागोठणे या ठिकाणी एकूण ३ लाख ८ हजार ५०० रुपयांचे मदतीचे धनादेश पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget