जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात पाणी शिरले ; प्रशासनाची धावाधाव

जळगाव - शहरापासून १८ किलोमीटरवर असलेल्या गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी शिरले. यामुळे अनेक रुग्णांना तातडीने दुसरीकडे हलवावे लागले. करोना रुग्णांसाठी या रूग्णालयातील ४०० खाटा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. परंतु, कोविड कक्षात नव्हे, तर रूग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पाणी शिरून नुकसान झाल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे.शहरासह जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. महाविद्यालयाबाहेर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्यास जागा नसल्याने ते थेट महाविद्यालयात शिरल्याचे प्रशासनाने सांगितले. रुग्णालयात पाणी शिरल्याने विषबाधा झालेले, अपघातात जखमी अशा रुग्णांना तातडीने दुसरीकडे हलवावे लागले.
दरम्यान, या प्रकरणाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दखल घेतली असून अधिष्ठात्यांना रुग्णालयाची पाहणी करण्यास सांगितले आहे. एवढे मोठे वैद्यकीय महाविद्यालय असल्याने त्यांच्या प्रशासनाची काही जबाबदारी आहे. वेळ पडल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस पाठवावी, असेही पाटील यांनी म्हटले आहे. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget