आधी पँगाँग टीएसओमधून मागे फिरा ; भारताने चीनला ठणकावले

लडाख - आधी पँगाँग टीएसओमधून मागे फिरा दोन्ही देशांच्या बैठकीत भारताने चीनला ठणकावले आहे.पूर्व लडाखच्या पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्रात चिनी सैन्याने घुसखोरी केली असून तिथून चीनने तात्काळ आपले सैन्य मागे घ्यावे असे भारताने चीनला स्पष्टपणे सांगितले आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर सोमवारी चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली.भारताकडून १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरींदर सिंग आणि चीनकडून मेजर जनरल लियू लीन या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. सकाळी ११.३० वाजता सुरु झालेली बैठक रात्री १०.३० पर्यंत म्हणजे तब्बल ११ तास चालली. एप्रिलच्या मध्यमामध्ये जी स्थिती होती, तशीच ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याची मागणी भारताकडून पुन्हा एकदा करण्यात आली. 
चिनी सैन्याने पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्रातील फिंगर चार ते फिंगर आठमधून मागे फिरावे तसेच गलवान, हॉटस्प्रिंग, देपसांग आणि चुशुलमध्ये सैन्याची जमवाजमव करुन युद्धजन्य स्थिती निर्माण केली आहे. तो तणाव कमी करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत असे भारताकडून चीनला सांगण्यात आले. 
दरम्यान,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. भारताची तिन्ही सैन्य दले रशियाच्या विजयी परेडमध्ये सहभागी होणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने राजनाथ सिंह रशियाकडे तात्काळ सुट्टया भागांचा पुरवठा करण्याची मागणी करणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील फायटर विमाने आणि भारतीय लष्कराच्या मुख्य रणगाडयांसाठी सुट्टया भागांची आवश्यकता आहे. या सुट्टया भागांचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी रशियाकडे केली जाणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget