भिवंडी महानगरपालिका आयुक्तापदी डॉ. पंकज आसिया यांची नियुक्ती

भिवंडी - भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यात महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप होत असताना अखेर महानगरपालिका आयुक्तांची डॉ. प्रवीण आष्टीकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
कोरोनावरून महानगरपालिका प्रशासनविरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य शासनाने महानगरपालिका आयुक्त म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी नियुक्त करावा, अशी जोरदार मागणी केली होती. त्याची राज्य शासनाने दखल घेतली आहे.विद्यमान महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांची शनिवारी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागेवर नाशिक उपजिल्हाधिकरी तथा कळवण येथील प्रकल्प अधिकारी डॉ. पंकज आसिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ. पंकज आसिया हे २०१६ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकारी आहेत. डॉ.आसिया यांनी शनिवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिका मुख्यालयातील दालनात येवून आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळात झालेले आर्थिक निर्णय वादग्रस्त ठरल्याबाबत तसेच कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येला आळा घालण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सपाचे आमदार रईस शेख़ , शिवसेना आमदार शांताराम मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष भगवान टावरे आदींनी निवेदन दिले होते. राज्य शासनाने भिवंडी महानगरपालिकेवर आयुक्त म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याने भिवंडीकर नागरिकांनी या नियुक्तीचे जोरदार स्वागत केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget