जिल्ह्यातील ७४३ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

जालना - सहकार ,पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक ३१ मे रोजी काढलेल्या एका आदेशामुळे जालना जिल्ह्यात सहकारी क्षेत्रात काम करणाऱ्या ७४३ संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे पतसंस्था आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या मंडळींचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.कारण राजकारणामध्ये आर्थिक उलाढाल करण्यासाठी सहकारी बँका आणि पतसंस्था मोठ्या प्रमाणात हाताशी धरल्या जातात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ मधील तरतुदीप्रमाणे राज्य शासनाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. यानुसार सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या महामारी मुळे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.जालना जिल्ह्यामध्ये ३१ जानेवारी २०१९ पर्यंत ३९७ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, या निवडणुका निधीअभावी झाल्याच नाहीत. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ३४६ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. मात्र, सहकार ,पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या या आदेशामुळे या निवडणुका देखील आता लांबणीवर पडल्या आहेत.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ब वर्ग मधील १५४, क वर्ग मधील ४६, ड वर्ग मधील १४६ संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ब वर्ग मधील १०३,क वर्गतील १६ आणि ड वर्ग मधील २७८ संस्थाच्या निवडणुका एकूण दोन्ही मिळून ७४३ निवडणुका निधीअभावी लांबणीवर पडल्या आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget