आशा स्वयंसेविकांची अमित ठाकरेंकडून 'आशा'

मुंबई - सार्वजनिक आरोग्य खात्याच्या 'राष्ट्रीय आरोग्य अभियाना'अंतर्गत राज्यात ७२ हजार आशा स्वयंसेविका आणि जवळपास ३५०० गटप्रवर्तक काम करत आहेत. आशा स्वयंसेविका कोरोना संकट काळात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता जनसेवा करणाऱ्या या स्वयंसेविकांना मात्र १६००-२५०० रुपये मानधन दिले जात आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी या स्वयंसेविकांकडून गेली काही वर्षं राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. अखेर शनिवारी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. यांच्या शिष्टमंडळाने आपल्या समस्या मांडत, आता मनसेच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते, अशी आशा व्यक्त केली आहे. यावेळी आशा स्वयंसेविकांनी काही मागण्या केल्या आहेत.
आशा आणि गटप्रवर्तकांना मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर, त्याशिवाय कोरोनाग्रस्त भागातील आशांना योग्य आणि पुरेशा प्रमाणात पीपीई किट उपलब्ध करुन देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय मोफत, नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. ५० वर्षांवरील किंवा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असलेल्या आशा स्वयंसेविकांना कोरोनाकाळात कामाची जबाबदारी द्यावी की नाही याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. ज्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांता कामाच्या ताणामुळे मृत्यू झाल्यास त्यांनादेखील ५० लाख रकमेचा विमा मंजूर करण्यात यावा.आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा. आशा स्वयंसेविकांना दरमहा पाच हजार रुपये ठराविक वेतन द्यावे. तसेच कामावर आधारित मोबदल्याचे दर जुने असून त्यात दुपटीने वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गटप्रवर्तकांना सध्या ७५०० ते ८२५० रुपये टि.ए.डी.ए.मिळतो. त्यात वाढ करुन, त्याशिवाय दरमहा दहा हजार रुपये ठरावीक वेतन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget