मुंबईतील रुग्णालयांना आरोग्य विभागाकडून कारणे दाखवा नोटीस

मुंबई - मुंबईतील हिंदुजा, जसलोक, बॉम्बे, लीलावती रुग्णालयांना राज्याच्या आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. करोना व्हायरसच्या रुग्णांसंबंधी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी रुग्णालयांनाही ८० टक्के बेड्स सरकारने ठरवून दिलेल्या दरात उपलब्ध करून देणे बंधनकारक केले. परंतु काही रुग्णालयांमध्ये सरकारच्या या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले होते.तर, काही रुग्णालयांमध्ये गरजुंना बेड्स देत नसल्याचे समोर आले होते. यानंतर आरोग्य विभागाने मुंबईतील हिंदुजा, जसलोक, बॉम्बे, लीलावती रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८०% खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत.मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.याची दखल घेऊन मुंबईतील खासगी रुग्णालयांना रात्री २ पर्यंत भेटी दिल्या.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget