रवी पुजारीविरोधात आरोपपत्र दाखल

बेंगळुरू - कुख्यात गुंड रवी पुजारी याच्याविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. सेनेगल येथून त्याचे भारतात हस्तांतर करण्यात आले आहे. त्यानंतर तो बेंगळुरू पोलिसांच्या ताब्यात आहे. शबनम विकासक खून खटला आणि बिल्डरकडून खंडणी वसूल करणे या दोन आरोपांखाली आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस सहआयुक्त संदीप पाटील यांनी ही माहिती दिली. शबनम विकसकाच्या खूनप्रकरणी अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. रवी पुजारीने मारेकऱ्यांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे. दुसऱ्या प्रकरणात पुजारीचे कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले आहेत. रवी पुजारी पंधरा वर्षे फरार होता. दक्षिण आफ्रिकेत त्याला पकडण्यात आले आणि नंतर सेनेगलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली. २३ फेब्रुवारी रोजी त्याला भारतात आणण्यात आले होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget