विधवा महिलांना गंडा घालणाऱ्याला अटक

पालघर - एका नामांकित सामाजिक संस्थेच्या नावाखाली व्यवसायासाठी भांडवल उभे करून देण्याच्या बहाण्याने विधवा महिलांना गंडा घालून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणात सुमारे दोन हजारांहून अधिक विधवा महिलांना सुमारे सात लाख ७४ हजारांचा गंडा घालणारा सूत्रधार मनोर पोलिसांच्या अटकेत आहे. न्यायालायने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
विक्रमगड येथे कुर्झे—दगडीपाडा येथील २५ वर्षीय आरोपी राहुल रामू वाडू हा मुंबई वरळी येथे असलेल्या एका नामांकित रुग्णालयात आरोग्य परिचर म्हणून काम करीत होता. तेथून त्याने काम सोडले. पुढे ऑक्टोबर २०१९ ला त्याने तो कामाला असलेल्या नामांकित सामाजिक संस्थेच्या नावाखाली पालघर जिल्ह्यात एक समूह तयार केला. या समूहातील सदस्य हे जिल्ह्यातील गाव पाडय़ात जाऊन व्यवसायासाठी भांडवल देऊ असा प्रसार करू लागले. यातून त्याने विविध भांडवली आमिषे नागरिकांना दाखवली. जिल्ह्यातील गावपाडय़ांत जाऊन गावात रस्ते, पाणीपुरवठा, वीज अशी कामे ही संस्था करेल. मात्र असे करताना विधवा महिलांना प्राधान्य देण्यात येईल व त्यांना व्यवसायासाठी भांडवल स्वरूपी चाळीस हजार रुपये देण्यात येतील असे सांगितले. याअंतर्गत नाव नोंदणी करण्यासाठी महिलांकडून प्रत्येकी तीनशे रुपये घेतले. अशा २५८० विधवा महिलांकडून ७,७४००० रुपये जमा केले असल्याचे समजते.
पैसे दिल्यानंतर अनेक महिने लोटूनही आपल्याला व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होत नाही असे लक्षात आल्यावर विचारणा केली असता वाडू उडवाउडवीची व फसवी उत्तरे देऊ लागल्याने काही महिलांनी मिळून मनोर पोलीस ठाणे गाठले.तिथे झालेल्या फसवणुकीच्या प्रकाराबाबत माहिती दिली. महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गंडा घालणाऱ्या राहुल वाडू याला मनोर पोलिसांनी अटक केली. त्यानेच ही फसवणूक केली असल्याची कबुली पोलिसांना दिली. मनोर पोलिसांनी त्याच्याकडुन आधारकार्ड, विविध महिलांच्या पतीचे मृत्यू दाखले, रेशन कार्ड,बँक पासबुक, बायोमेट्रिक मशीन, लॅपटॉप , दोन मोबाइल जप्त केले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget