'गुलाबो सिताबो' चित्रपट प्रदर्शन लांबणार, जुही चतुर्वेदी यांच्यावर एक मराठी संहिता चोरल्याचा आरोप

मुंबई - प्राईम व्हिडीओवर १२ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्या 'गुलाबो सिताबो' या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चित्रपटाच्या लेखिका जुही चतुर्वेदी यांच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.वकील रिजवान सिद्दीकी यांनी दावा केला आहे की, गुलाबो सिताबो चित्रपटाची संहिता स्वर्गीय राजीव अग्रवाल यांनी लिहिली होती आणि जुही चतुर्वेदी यांनी संहिता चोरली आहे. राजीव अग्रवाल यांचे निधन झाले असून त्यांचा मुलगा आकिरा यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटिसमध्ये त्यांनी संहिता दाखविण्याची मागणी केली आहे.वकील रिजवान सिद्दीकींद्वारा आकिरा यांनी ही नोटीस चित्रपट दिग्दर्शक सुजीत सरकार आणि निर्माते अरिजीव ध्रुव लहरी आणि लेखिका जुही चतुर्वेदी यांना पाठवली आहे. या नोटीसमध्ये स्पष्टपणे संहिता चोरण्याचा आरोप केला आहे. मात्र अद्याप कोणीच ही संहिता दाखवलेली नाही. यापूर्वी २०१९ मध्येही जुही चतुर्वेदी यांच्यावर एक मराठी संहिता चोरल्याचा आरोप करण्यात आला होता.लेखक राजीव अग्रवाल यांचा मुलगा आकिरा यांच्याकडून या प्रकरणाची माहिती स्क्रीन रायटर असोसिएशनला देण्यात आली असून असोसिएशननेही जुही चतुर्वेदी यांनी संहिता दाखवण्यास सांगितले आहे.
वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे क्लाइंटचे वडील राजीव अग्रवाल यांनी स्क्रीन रायटर असोसिएशनच्या एका स्क्रिप्ट रायटिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. ज्यामध्ये जुही चतुर्वेदी परीक्षक होत्या. राजीव अग्रवाल यांचा दावा आहे की, असोसिएशनला याबाबत माहिती आहे. यादरम्यान जुहीने संहिता चोरली आहे. त्यामुळे वारंवार सांगूनही त्या गुलाबो सिताबो या चित्रपटाची संहिता असोसिएशनसमोर ठेवत नाही. आकिरा उद्या या प्रकरणात मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात संहिता चोरल्याची तक्रार दाखल करणार आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget