आजपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला

अमरावती - लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून मेळघाटातील पर्यटन स्थळे बंद होती. मात्र, आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणारी सर्व पर्यटन स्थळे पर्यंटकांसाठी आजपासून खुली करण्यात येणार आहेत. यात फक्त जंगल सफारी आणि इतर सुविधाच सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक यांनी गुरुवारी आदेश जारी केले आहेत. आज पासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य, काटेपुर्णा वन्यजीव अभयारण्य, लोणार वन्यजीव अभयारण्य आणि टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य निसर्ग पर्यटन केंद्र तसेच चिखलदरा जवळचे सीमाडोह, हरीसाल आदी पर्यटन स्थळे अटी शर्तीसह सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेळघाटात पर्यटनासाठी येणारे हजारो पर्यटक हे दोन दिवसांसाठी येत असतात. परंतु कोरोनाचा पादुर्भाव टाळण्यासाठी आता पर्यटकांना याठिकाणी थांबण्याच्या सुविधेची मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही.मागील तीन महिन्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प बंद असल्याने स्थनिक व्यवसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक दिवसांपासून पर्यटकांसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुरू करण्याची मागणी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावर वनमंत्री यांनी १ जुलैपासून राज्यातील सर्वच प्रकल्प सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आजपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प अखेर सुरू होणार असल्याचे आदेश गुरुवारी काढण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget