कोरोनाचा कहर ; देशात रुग्णांची संख्या साडेचार लाखांवर

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी चार लाखांच्या वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे १५९६८ नवे रुग्ण वाढले आहेत. तर ४६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या १८३०२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर २५८६८५ रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत ४४७६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना चाचणीची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. पहिल्यांदाच एका दिवसात २ लाख १५ हजार १९५ चाचण्या घेण्यात आल्या. देशात कोरोनाची चाचणी घेण्यासाठी प्रयोगशाळांची संख्या १००० वर पोहोचली आहे. बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही देशासाठी दिलासा देणारी बाब आहे. आता ती वाढून सुमारे ५६.७१% झाली आहे.
भारतात सलग पाचव्या दिवशी १४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत मृत्यू झालेल्या ४६५ रुग्णांपैकी २४८ महाराष्ट्रात, दिल्लीत ६८, तामिळनाडूमध्ये ३९, गुजरातमध्ये २६, उत्तर प्रदेशात १९, पश्चिम बंगालमधील ११, राजस्थान आणि हरियाणा, कर्नाटकमधील प्रत्येकी ९ रुग्णांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात आठ जणांचा मृत्यू, पंजाब आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी चार, तेलंगणामध्ये तीन, जम्मू-काश्मीर, ओडिशा आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. केरळ, बिहार आणि पुडुचेरी मध्ये प्रत्येक एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget