राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू

मुंबई - राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात २७८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १७८ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यामध्ये मुंबईतील ५८ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे. 
राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत सोमवारी १०६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९,२०१ इतकी झाली आहे. तर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १,१०,७४४ इतकी झाली आहे. यापैकी ५६०४९ रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. 
मात्र, राज्यात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय होते. राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात ५,०७१ रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले. मुंबई मंडळात सर्वाधिक ४२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत महाराष्ट्रात ५६,०४९ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यापूर्वी २९ मे रोजी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्याहून अधिक झाला आहे. 

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget