भारताने अमेरिकेपासून दूर राहावे; चीनचा भारताला इशारा

नवी दिल्ली - एकीकडे भारत आणि चीनदरम्यान सीमेवरीव तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे चीन आपल्या सरकारी वृत्तपत्रातून भारतविरोधी गरळ ओकताना दिसत आहे. दरम्यान, भारताने आपल्या धोरणांचे पालन करावे आणि अमेरिकेपासून दूर राहावे, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. चीनचा विरोध करण्यासाठी भारताने अमेरिकेला साथ दिली तर चीन आपल्या हितांचे रक्षण करण्यास मागेपुढे पाहणार नाही, मग ते राजकीय असेल किंवा आर्थिक, असेही ग्लोबल टाईम्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
भारत आणि चीन या दोन्ही देशांदरम्या परस्पर सहमतीनंतर सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत, असे ग्लोबल टाईम्सने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांच्या हवाल्याने म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांमधील तणावाचं वातावरण कमी होत असल्याच्या काही विश्लेषकांच्या वक्तव्यांचीदेखील यात प्रशंसा करण्यात आली आहे.
दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव कमी झाल्याने दोन्ही देशांमध्ये भविष्यात आर्थिक आणि व्यापाराचे आदान प्रदान करण्याची संधी मिळेल. हे दोन्ही देशांच्या हिताचे ठरणार आहे. जर दोन्ही देशांमध्ये तणाव कायम राहिला असता किंवा वाईट परिस्थितीत तो संघर्षात बदलला असता तर भारत चीन या दोन्ही देशांच्या संबंधांना पुढे नेण्यासाठी काही उरले नसते. जर राजकारणाचा अर्थव्यवस्था आणि व्यवहारावरील परिणाम पाहिला असता तर द्विपक्षीय व्यापारावर नक्कीच प्रभाव जाणवला असता कारण भारतातही चीनविरोधी भावना वेगाने वाढत आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget