कोरोनामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचा मृत्यू

ठाणे - देशभरात कोरोनाचे थैमान सुरु असताना,सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आढळत आहेत. मुंबई आणि ठाण्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मंगळवारी शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आता ठाण्यातील राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी मीरा-भाईंदरचे शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हरिश्चंद आंमगावर यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी कोरोनाचे १४५ रुग्ण वाढले होते. आतापर्यंत ठाण्यात कोरोनाचे ४३४३ रुग्ण आढळले असून १९४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ठाण्यात आतापर्यंत १२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २२६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget