मनसेच्या पदाधिकाऱ्याने हॉस्पिटलमधून रुग्णाला पळवले

मुंबई - मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.एकीकडे डॉक्टर कोरोनाग्रस्त रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, रुग्ण थोडे फार बरे होताच डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करीत असल्याचे समोर येत आहे. घाटकोपर भागातील हॉस्पिटलमधून मनसे नेत्याने कोरोना रुग्णाला पळवून नेण्याची धक्कादायक घटना घडली आहे.घाटकोपरमध्ये चक्क एका रुग्णालाच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपचार सुरू असताना पळवून नेले आहे. या रुग्णाचे बिल रुग्णालयाने जास्त लावले आहे आणि त्यांना धडा शिकविण्यासाठी हे केले असल्याची पोस्ट मनसैनिकांनी व्हायरल केल्या आहेत.घाटकोपर परिसरातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. या व्यक्तीची पत्नी मनसेच्या कार्यकर्त्या आहेत. कोरोना झाल्याने २१ मेपासून घाटकोपरच्या हिंदुसभा रुग्णालयाच्या कामलेन येथील कोरोना केंद्रात उपचारासाठी दाखल झाले होते.तब्येत खालावली गेली तेव्हा त्यांना अतिदक्षता विभागात उपचारास दाखल करण्यात आले. १० दिवस त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांचे बिल दोन लाखाच्या जवळपास झाले होते. मात्र, हे बिल जास्त असल्याचा आरोप करीत मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या रुग्णाला कोरोना केंद्रातून पळून नेले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget