कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत पाचव्या स्थानावर

नवी दिल्ली - भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून,देश कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार त्याचप्रमाणे राज्य सरकार युद्ध पातळीवर मेहनत करताना दिसत आहेत. या जागतिक महामारीच्या विळख्यात सापडलेल्या देशांपैकी भारत पाचव्या स्थानावर आहे. शनिवारी स्पेनला मागे टाकत करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठच्या सांगण्यानुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ४५ हजार ६७० वर गेली आहे.कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता भारताने इटली आणि स्पेन या दोन देशांना कोरोना संक्रमणात मागे टाकले आहे. ही गोष्ट भारतासाठी अत्यंत चिंताजनक असल्याची बाब समोर येत आहे. तर अमेरिका, ब्राझील, रूस, आणि ब्रिटेनमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्येत सतत झपाट्याने वाढ होत आहे.विजॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अकड्यानुसार स्पेनमध्ये आतापर्यंत २ लाख ४१ हजार ३१० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.भारताने स्पेनलाही मागे टाकले आहे. भारतात आतापर्यंत ६ हजार ६४२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget