हिंगोलीत पावसाच्या पाण्याने पूल गेला वाहून

हिंगोली - जिल्ह्यातील विविध भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे सेनगाव तालुक्यातील नरसी नामदेव येथील सेनगाव ते हिंगोली रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीसाठी हा पर्यायी पूल निर्माण करण्यात आला होता. मात्र तो पूल वाहून गेल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
नरसी नामदेव येथील सेनगाव ते हिंगोली मार्गावरील गोमती नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी दुसरा पर्यायी पूल बांधण्यात आला होता. मात्र, जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून पाऊस हजेरी लावत आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे गोमती नदीला पूर आला आणि वाहनासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे हिंगोलीकडे सेनगाव मार्गे जाणाऱ्या वाहनांची मोठी तारांबळ उडाली आहे. परिणामी हिंगोली-सेनगावकडे वाहतूक खोळंबली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget