'त्या'विकृत डॉक्टरला अटक होणार

मुंबई - वोक्हार्ट रुग्णालयात आयसीयूमध्ये करोनावर उपचार घेणाऱ्या ४४ वर्षीय पुरुष रुग्णासोबत लैंगिक चाळे केल्याचा आरोप असलेल्या ३३ वर्षीय डॉक्टरला अटकेपासून संरक्षण देण्यास विशेष लॉकडाउन न्यायालयाने नकार दिला आहे. 'विकृत व निंदनीय कृती केल्याचा आरोप लक्षात घेता आरोपीची कोठडीत चौकशी होणे गरजेचे आहे', असे नमूद करून न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
वोक्हार्ट रुग्णालयातील ८० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने ३० एप्रिलला तातडीने युवा डॉक्टरांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेतले होते. त्यात या आरोपी डॉक्टरचाही समावेश होता. १ मे रोजी त्याला करोनाच्या आयसीयूमध्ये काम दिले होते. मात्र, त्या विभागात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने आरडाओरड करून नर्सला बोलावून घेत या डॉक्टरने त्याच्यासोबत लैंगिक चाळे केल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याविषयी लेखी तक्रारही दिली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरवर बडतर्फीची कारवाई करतानाच पोलिसांत तक्रारही दिली. त्याअनुषंगाने आग्रीपाडा पोलिसांनी २ मे रोजी डॉक्टरविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवला. त्यामुळे अटक होण्याच्या भीतीने डॉक्टरने अर्ज केला होता.
'रुग्णालय प्रशासनाने माझ्यावर खोटा आरोप करून विनाकारण गोवले आहे', असा दावा सध्या अलगीकरणात असलेल्या या डॉक्टरने अर्जात केला होता. मात्र, 'करोना रुग्णांवर उपचार करणारे व त्यांची काळजी घेणारे डॉक्टर, नर्स इत्यादींविषयी समाजात सध्या अत्यंत आदराची भावना आहे. असे असताना रुग्णालय प्रशासनाकडून आरोपी डॉक्टरविरोधात खोटी तक्रार केली जाण्याचे कोणतेही कारण दिसत नाही', असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने आरोपीचा युक्तिवाद फेटाळून लावला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget