राम मंदिर उभारणीच्या कामाला तुर्तास स्थगिती ; राम मंदिर ट्रस्टचा निर्णय

नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या चकमकीत २० भारतीयांना जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टनेही मोठा निर्णय घेतला आहे. राम मंदिर उभारणीचे काम तुर्तास थांबवण्यात येणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे आणि देशाचे संरक्षण करणे ही सर्वात महत्त्वाचे आहे, असे राम मंदिर ट्रस्टने म्हटले आहे.
राम मंदिर प्रश्नी मागील वर्षी न्यायालयाकडून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राम मंदिराच्या उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, राम मंदिर ट्रस्टने भारत चीन सीमेवरील तणावाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच नव्या तारखेचीही घोषणा करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती दिली. मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय देशातील परिस्थितीनुसार घेतला जाईल आणि अधिकृतपणे जाहीर केला जाईल, अशी माहिती ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी पीटीआयशी बोलताना दिली.
दरम्यान, अयोध्येत विविध हिंदू संघटनांनी चीनविरोधात निदर्शने केली. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी चीनचा ध्वज जाळून आपला निषेध व्यक्त केला. तर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग यांचा पुतळा जाळत आणि चिनी बनावटीच्या वस्तू तोडून आपला संताप व्यक्त केला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget