भाजपची जनसंवाद रॅलीत मोदींच्या कामाचे कौतुक

नवी दिल्ली - भाजपला कोरोना काळत मैदानी सभा घेता येत नसल्या तरी पक्षाकडून व्हर्चुअल जनसंवाद रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसह सर्व वरिष्ठ मंत्री मोदी सरकारच्या योजना आणि कामे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. शनिवार झालेल्या जनसंवाद रॅलीत अनेक नेत्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात केलेल्या कामांची माहीत दिली. तर कोरोनाच्या व्यवस्थापनावरून केजरीवाल सरकारला लक्ष्य केले.
यावेळी बोलताना भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केजरीवाल सरकारवर टीका केली. कोरोनाच्या भीतीने केजरीवाल चार भिंतीच्या बाहेर निघत नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ताठ मानेने सांगू शकतात की हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील आठ रुग्णालयांचे दौरे केले आहेत. सर्व कार्यकर्ते कठीण परिस्थिती काम करत आहेत, त्या सर्वांचे स्मृती इराणी यांनी आभार मानले.'फीड द नीडी' कार्यक्रमाद्वारे दिल्लीतील एक कोटींपेक्षा जास्त गरजू नागरिकांना अन्न पुरवले, त्यासाठी इराणी यांनी भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांचे आभार मानले. कोरोना सारख्या महामारीचा आपण सर्वजण नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली सामना करत आहोत. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेज मोदींनी जाहीर केले. त्याअंतर्गत देण्यात आलेल्या योजनांचा आणि मदतीचा स्मृती इराणी यांनी उल्लेख केला. यावेळी इतरही अनेक नेत्यांनी भाषण केले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget