आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली - दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप आणि श्वसनासाठी होत असलेल्या त्रासाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली.सोमवारी रात्री त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण अचानक कमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
सध्या देशभरात करोनाचे संकट घोंगावत आहे. सोमवारी दिल्लीत १ हजार ६४७ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच ७३ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत आतापर्यंत ४२ हजार ८२९ करोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी दिल्लीत ६०४ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. तर आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही १६ हजार ४२७ झाली आहे. तर दिल्लीत आतापर्यंत करोनामुळे १ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत सध्या २५,००२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget