राज्यातील सर्व रुग्णालये फक्त दिल्लीकरांसाठी आरक्षित ; केजरीवालांचा निर्णय

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील रुग्णालये केवळ दिल्लीकरांसाठीच आरक्षित राहतील. केवळ दिल्लीकरांवरच उपचार केले जातील. हरियाणा, उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यातील नागरिकांवर दिल्लीत उपचार केले जाणार नाही. मात्र, केंद्र सरकारची रुग्णालये सर्वांसाठी खुली राहतील.
हरियाणा आणि युपीच्या सीमा दिल्लीला लागून आहेत. त्यामुळे दिल्लीतील रुग्णांलयांमध्ये मोठ्या प्रमाणात येथून रुग्ण येतात. त्यामुळे दिल्लीकरांसाठी बेड उपलब्ध होणार नसल्याची भिती दिल्ली सरकारला वाटत असल्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला.इतर रुग्णांना परवानगी दिली तर ३ दिवसात सर्व बेड भरुन जातील. पाच तज्ञांच्या समितीने सल्ला दिला होता. सध्या दिल्ली सरकारकडे १० हजार बेड्स आहेत. जून अखेर १५ हजार बेड्सची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget