वेबसीरिजमध्ये झळकणार अभिषेक

मुंबई - बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन या नावाचे फार मोठे नाव असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलाने अभिषेक बच्चनने कलाविश्वात पदार्पण केले. काही मोजक्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची बाजू दाखविणाऱ्या अभिषेकने त्याची पावले वेबविश्वाकडे वळविली आहेत. लवकरच तो डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय आणि नावाजलेल्या अॅमेझॉन प्राइमच्या आगामी ‘breathe in to the shadows’ या नव्या वेबसीरिजमध्ये अभिषेक झळकणार आहे. अलिकडेच या सीरिजचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले असून अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केले आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.२०१८ मध्ये अॅमेझॉन प्राइमवर ‘ब्रीद’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही सीरिज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरली होती. या सीरिजमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार आर. माधवन आणि अमित साध यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे या सीरिजचा पुढील सीझन प्रदर्शित व्हावा अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत होती. सुरुवातीला ‘breathe in to the shadows’ चे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर हा ब्रीदचा पुढचा सीझन असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. मात्र हा पुढील सीझन नसून नवीन वेबसीरिज आहे.
दरम्यान, सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असलेली ही सीरिज येत्या १० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चनसह अभिनेता अमित साध, सयामी खेर आणि निथ्या मेनन देखील झळकणार आहे. निथ्या मेननचादेखील हा डिजिटल डेब्यु असल्याचे म्हटले जात आहे. या सीरिजची निर्मिती अबुंदंतिया एन्टरटेन्मेंट यांनी केली असून दिग्दर्शन मयांक शर्मा यांनी केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget