भारत-चीन हिंसक झडप ; जनतेची दिशाभूल करणे थांबवा - कमल हसन

मुंबई - भारत- चीनदरम्यान झालेल्या हिंसक संघर्षाबाबत भावनिकरित्या जनतेची दिशाभूल करणे थांबवा या शब्दांत ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. कलाविश्वाकडून राजकीय वर्तुळाकडे वळलेल्या हसन यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.जवळपास आठवडाभरापूर्वी ल़डाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या लष्करामध्ये हिंसक झडप झाली होती. यामध्ये दोन्ही देशांच्या सैन्यातील जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. या संघर्षाची माहिती समोर आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरिय बैठका, चर्चांची सत्र सुरु झाली आरोप - प्रत्यारोप झाले. याच मुद्द्यावर हसन यांनी सरकारची भूमिका अधोरेखित करत त्याबाबत आपले मत मांडले. 
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीदरम्यान मोदींच्या भूमिकेला त्यांनी धारेवर धरले. 'आपल्या हद्दीत कोणीही घुसखोरी केली नव्हती आणि आपल्या लष्कराच्या चौकीवर कोणाचाही ताबा नव्हता', असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर निशाणा साधत अशा प्रकारची भावनिक वक्तव्य करत जनतेची दिशाभूल करणे थांबवा अशीच एक प्रामाणिक विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना करतो, अशी स्पष्ट भूमिका हसन यांनी मांडली. 
'सरकारच्या भूमिकेवर किंवा कोणत्याही मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे देशद्रोह नाही. किंबहुना प्रश्न उपस्थित करणे हा तर लोकशाहीचा पाया आहे आणि आम्ही प्रश्न विचारणारच जोपर्यंत सत्य आम्हाला कळत नाही', या शब्दांत सर्वपक्षीय बैठकीतील पंतप्रधान, लष्करी अधिकारी आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या विरोधाभासी भूमिकांवर हसन यांनी हल्लाबोल चढवला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget