गंभीर कोरोनाग्रस्तांनाच बेड मिळावा - किशोरी पेडणेकर

मुंबई - मुंबईमधली कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. गंभीर आणि तातडीने उपचारांची गरज असलेल्यांनाच हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, असे त्या म्हणाल्या आहेत. रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर, लगेचच बेड मिळावा असे त्यांना वाटते, पण असे होऊ शकत नाही. हॉस्पिटल्सवरही खूप तणाव आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. दरम्यान,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हॉस्पिटलमधल्या बेडच्या प्रश्नावरुन सरकारवर टीका केली होती. 'महात्मा फुले जनआरोग्य योजना फक्त नोंदणीकृत रुग्णालयात केली जात आहे. काही मोठ्या रुग्णालयात बेड्स नाहीत, असे दाखवले जात आहे, पण मागच्या दरवाजाने प्रवेश दिला जात आहे. खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड्स कागदावरच घेतले आहेत', असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget