पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना सात दिवसात भारत सोडण्याचे आदेश

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयाला ७ दिवसांच्या आत ५० टक्के कर्मचारी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भारतही पाकिस्तानातील आपल्या उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात करणार आहे. पाकिस्तानचे अनेक अधिकारी, कर्मचारी अवैध आणि देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचे आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाला या निर्णयाची माहिती दिली आहे. हेरगिरी आणि दहशतवादी संघटनांच्या संपर्कात पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे संबध असल्याचे म्हणत भारताने हा निर्णय घेतला आहे. नुकतेच पाकमधील दोन भारतीय अधिकाऱ्यांचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अपहरण केले होते. तसेच त्यांना हीन वागणूक देण्यात आली होती. याचा उल्लेखही परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात केला आहे.राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानकडून चांगली वागणूक मिळत नाही. हे कृत्य व्हिएन्ना करार आणि द्विपक्षीय करारांच्या विरोधात आहे. तसेच दहशतवाद आणि सीमेपलीकडून करण्यात येणाऱ्या कारवाया ही पाकिस्तानी अधिकाऱ्यांची अंगभूत प्रेरणा दिसून येते, असे परराष्ट मंत्रालायने म्हटले आहे.पाकिस्तानध्ये कार्यरत असलेल्या काही भारतीय अधिकाऱ्यांनाही माघारी बोलविण्यात येणार आहे. सात दिवसांच्या आत हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. या निर्णयाची पाकिस्तानला माहिती देण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget