माझ्या मनातही दोनदा आत्महत्येचा विचार आला होता, मिलिंद देवरांचा खुलासा

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वातून दु:ख व्यक्त होत आहे. या प्रकरणानंतर अनेकजण भावूक झाले असून ते सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसत आहेत. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर नैराश्येला सामोरे जात असताना अनेकांच्या मनात आत्महत्येसारखे विचार डोकावतात. पण त्यावर मात करुन बरीच मंडळी पुढे जातात. माझ्या मनात दोन वेळा आत्महत्येचा विचार आल्याचे कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्वीट करत त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. 
तारुण्यात आणि खासदार झाल्यानंतर अशा दोन वेळा माझ्या मनात आत्महत्येचे विचार आल्याचे मिलिंद देवरांनी म्हटले. पण यावर आपण कशी मात केली हे देखील त्यांनी स्पष्ट केलंय. यासाठी त्यांनी पाच सुत्र सांगितली आहेत. तुमचे कुटुंब, मित्र परिवार, सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही यावर मात करु शकता असे ते म्हणाले. नैराश्य, मानसिक आजारावर मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊन मात करता येऊ शकते. आतल्या नकारात्मकतेशी आपले द्वंद सुरु असते, त्या नकारात्मकतेला मोठे होऊ देऊ नका. आयुष्य सुंदर आहे. ते वाचन, संगीत, प्रवास तसेच आवडत्या व्यक्तींसोबत व्यतीत करा. जे तुम्हाला आनंदी ठेवेल ते निवडा. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वत:वर प्रेम करा. असे देवरा यांनी ट्वीटरवर म्हटले.
सुशांतने जेव्हा आत्महत्या केली, तेव्हा तो घरात एकटाच नव्हता, तर त्याचे काही मित्रही होते, अशी माहितीही समोर येत आहे. पोलिसांमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या घरातून काही कागदपत्र मिळाली आहेत, यामधून तो डिप्रेशनमधून जात होता, हे दिसत आहे. सुशांत सिंगने आत्महत्या केली आहे. संशयास्पद असे सध्या तरी काही हाती लागलेले नाही, असे झोन ९ चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे म्हणाले. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget