आरोग्य व्यवस्थेतील अनागोंदी कारभारावर किरीट सोमय्या यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र

मुंबई - मुंबईतील आरोग्य व्यवस्थेत चाललेल्या अनागोंदी कारभारावरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर उपरोधिक शब्दांत टीका केली आहे. महापालिका व सरकारचे नियोजन कसे चुकते आहे हे दाखवण्यासाठी सोमय्या यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिले आहे. मुंबईत करोनाचे असंख्य रुग्ण सुविधांपासून वंचित आहेत. महापालिका व राज्य सरकारला उपचाराचे नियोजन करणे अजूनही जमले नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. गोरेगाव येथील नेस्को संकुलात सरकारने ३ हजार खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. मात्र, तेथील अवघ्या ३८७ खाटांवर रुग्ण आहेत. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानावर उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात १०८७ खाटा आहेत. मात्र, तिथे केवळ ३१५ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईतील केईएम, शताब्दी, सायन हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण लॉबीमध्ये आहेत. एका खाटावर दोन-दोन रुग्ण उपचार घेत आहेत आणि दुसरीकडे खाटा रिकाम्या आहेत, हे त्यांनी निदर्शनास आणले आहे.त्यानंतर त्यांनी 'ठाकरे सरकार की जय हो,' असा टोलाही लगावला आहे.
मुंबईत आयसीयू सुविधा असलेल्या खाटांची तातडीची गरज आहे. मात्र, तशी कुठलीही सुविधा नाही, असे का? महाराष्ट्र सरकारने याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सोमय्या यांनी टोपे यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget