अहमद पटेलांच्या घरी 'ईडी'चे पथक; गैरव्यहारप्रकरणी चौकशी सुरु

नवी दिल्ली - संदेसरा समूहाच्या ५००० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक त्यांच्या घरी धडकले. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी 'ईडी'च्या तीन अधिकाऱ्यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल झाले. सध्या 'ईडी'च्या पथकाकडून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. अहमद पटेल हे संदेसरा बंधुंच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. यापूर्वी 'ईडी'कडून अहमद पटेल यांच्या जावयाचीही चौकशी करण्यात आली होती. यानंतर 'ईडी'कडून अहमद पटेल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊनचे कारण पुढे करून अहमद पटेल यांनी चौकशीसाठी हजर राहणे टाळले होते. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. त्यामुळे सरकारी नियमावलीनुसार मी चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचे अहमद पटेल यांनी 'ईडी'ला कळवले होते. त्यामुळे आता 'ईडी'कडून एक पथक त्यांच्या घरी पाठवण्यात आले. 
स्टर्लिंग बायोटेक ही गुजरातस्थित कंपनी आहे. या कंपनीवर आंध्रा बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मोठी नावे गुंतल्याची शक्यता आहे. तब्बल १४५०० कोटींच्या गैरव्यवहारात स्टर्लिंग बायोटेकचे मुख्य प्रवर्तक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा प्रमुख आरोपी आहेत. हे सर्वजण सध्या फरार आहेत. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget