वाऱ्यामुळे घडला मुंबई एअरपोर्टवर अपघात

मुंबई - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अपघात झाल्याचे वृत्त आहे. मुंबईत आज सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत होता. जोरदार वाऱ्यामुळे विमानतळावर पार्क असलेल्या इंडिगोच्या विमानाला स्पाइस जेटची शिडी धडकून अपघात झाला.
शनिवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्क असलेल्या इंडिगो A320 या विमानाला स्पाइस जेटची शिडी धडकली. यामुळे स्पाइस जेटच्या शिडीचे बरेच नुकसान झाले, तर इंडिगो विमानाच्या इंजिनच्या बाहेरील भागाचेही नुकसान झाले आहे. तसेच, विमानाच्या पात्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे कळते. सकाळपासून सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शिडी विमानाला धडकली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी मुंबई विमानतळ, इंडिगो किंवा स्पाइस जेट यांपैकी कोणीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगर तसेच नवी मुंबई, ठाणे, कल्याण पट्ट्यात आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई उपनगर जिल्हा व ठाणे परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. पण आता काही तासांपासून पावसाने बहुतांश भागात विश्रांती घेतली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget