आसाममध्ये तेलाच्या विहिरीत अग्नितांडव

गुवाहाटी - आसाममधील ऑइल इंडिया लिमिटेडच्या (OIL) तेलविहिरीत मोठा स्फोट झाल्यानंतर भयंकर आग लागली होती. ही आग गेल्या काही दिवसांपासून धुमसत आहे. १४ दिवसांपासून सुरू असलेल्याा या आगीने रौद्र रुप धारण केले असून आता आसपासच्या गावांमध्ये ही आग पसरली आहे. या आगीत ६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये ही आग वेगाने पसरत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आसामचे पर्यावरण व वनमंत्री परिमल सुखाबैद्य म्हणाले, आसाममधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसाम सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पण ही आग आता जवळपासच्या गावांमध्ये वेगानं पसरत आहे. या आगीमुळे गावातील ६ लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी साधारण एक महिना लागू शकतो असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.देशातले महत्त्वाचे खनिज तेल उत्पादक केंद्र असलेल्या बघजन ऑइल इंडिया लिमिटेडच्या (OIL) तेलविहिरीत मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीचे लोळ आणि धूर अनेक किलोमीटरपर्यंत दिसत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget