भिवंडीत मृत्यू वाढल्याने कब्रस्तानात जागा मिळेना

भिवंडी - करोनामुळे होणारे मृत्यू आणि दररोज वाढणारा मृतांचा आकडा यामुळे भिवंडी शहर हादरले आहे. वाढत्या मृत्यूंमुळे कब्रस्तानांतील जागा अपुरी पडत असून कबर खोदण्यासाठी कामगार मिळणेही कठीण झाले आहे.करोना उद्रेकापूर्वी दररोज केवळ एक ते दोन मृतदेहांना दफन करणारे कर्मचारी १२ ते १५ मृतदेहांसाठी कबरी खोदत आहेत. दररोज ८ ते १२ कबरी खोदून काही कब्रस्तानातील कामगार आजारी पडले आहेत, तर काहींनी संसर्गाच्या भीतीने काम सोडले आहे. परिणामी, मृतांना दफन करण्यासाठी जागा आणि कबरी खोदण्यासाठी कामगार शोधताना यंत्रणा हतबल झाली आहे.करोना फैलावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात भिवंडीत आठ दिवस एकही रुग्ण आढळला नव्हता. मुंब्रा, मालेगावसारख्या मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये रुग्णांचा आकडा वाढत असताना भिवंडीत रुग्ण नाहीत असे म्हणत स्थानिक यंत्रणा पाठ थोपटून घेत होत्या. हे असे का झाले असावे यामागील कारण आता पुढे येऊ लागले आहे.
दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या भिवंडी शहरात अजूनही दिवसाला जेमतेम ५० ते ७० करोना चाचण्या होत आहेत. मुंबई-ठाण्यासारख्या शहरात करोना रुग्णांना दाखल करण्यासाठी खाटा उपलब्ध नाहीत अशा तक्रारी असताना भिवंडीत चाचण्यांसाठी आरक्षण करावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. या चाचण्यांचा अहवाल येण्यास ३ ते ४ दिवस लागत आहेत. अहवाल येईपर्यंत अनेक रुग्णांचे उपचारांपूर्वीच जीव जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. येथील करोना मृतांचा आकडा खूप मोठा असण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget