मालेगावात 'कुत्तागोळी'चा साठा जप्त,एकाला अटक

नाशिक - जिल्ह्यात नशेच्या गोळ्या आणि इतर औषधांसह एकाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून कुत्तागोळी, कफ सिरप, व्हियाग्रा असा सव्वादोन लाखांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. मालेगावात अपर पोलीस अधिक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली. शेख वसीम अब्दुल खालिद असे आरोपीचे नाव आहे.
अपर पोलीस अधिक्षक संदीप घुगे माहिती देताना..जिल्ह्यातील मालेगाव शहर व ग्रामीण परिसरातील तरुण नशेसाठी कुत्ता गोळीचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे दिसून येत आहे. मालेगावच्या जुना आझाद नगर परिसरात शेख वसीम अब्दुल खालिद नावाचा तरुण कुत्तागोळी विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिताफीने छापा मारून त्याच्याकडून नशेच्या गोळ्यांसह अन्य औषधांचा सव्वादोन लाखांचा साठा जप्त केला आहे.
महिलांना प्रसुतीवेदनेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने देण्यात येणारी अलप्राझोलम गोळी मालेगावात 'कुत्तागोळी' म्हणून ओळखली जाते. मानसिक आजार व झोप न येणे अशा रुग्णांसाठी ही गोळी अल्प प्रमाणात देण्यात येते. मात्र, मालेगावसह ग्रामीण भागात या गोळीचा नशेसाठी वापर केला जातो. जप्त केलेल्या या औषधांची परिसरात सर्रास विक्री होत आहे. याआधीही पोलिसांनी तीन लाखांचा औषधसाठा जप्त केला होता. या गोळ्यांमुळे येथील तरुण नशेच्या आहारी गेले आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget