मुख्य सचिवांना पुन्हा मुदतवाढ मिळणार का ? मुदतीचा कार्यकाळ ३० जूनला संपणार आहे

मुंबई - राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांची मुदत येत्या ३० जून रोजी संपत असून त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळणार की, दुसरी व्यक्ती यापदावर नियुक्ती केली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मेहता यांना यापूर्वी दोनदा मुख्य सचिवपदी मुदतवाढ मिळाली आहे. त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यास महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या काही मंत्र्यांचा विरोध आहे. तर मेहतांना मुदतवाढ दिली तर प्रशासनातील इतर अधिकार्‍यांची मुख्य सचिव बनण्याची संधी हुकणार आहे़.मेहतांना मुदतवाढ मिळाली नाही तर उद्धव ठाकरे त्यांना आपले मुख्य सल्लागार नियुक्त करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र यालाही मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांचा विरोध आहे. मेहता यांना मुदतवाढ मिळाली नाही तर तीन अधिकारी सेवा ज्येष्ठतेनुसार स्पर्धेत आहेत.यात गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार असून ते फेब्रुवारी २०२१ मध्ये निवृत्त होत आहेत. त्याचबरोबर सध्या सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव असलेले १९८५ च्या बॅचचे सीताराम कुंटे हेही स्पर्धेत आहेत. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget