धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण ; संपर्कातील २८ व्यक्तींना होम क्वारंटाइन

मुंबई -  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. या अगोदर दोन अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रिमंडळात कार्यरत असलेल्या मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची चिंता आता वाढली आहे.धनंजय मुंडेसह त्यांच्या कार्यालयातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरूवारी रात्री या सगळ्यांच्या चाचणीचा अहवाल आला. धनंजय मुंडे आज शुक्रवारी रूग्णालयात दाखल होणार आहेत. धनंजय मुंडे दररोज मंत्रालयात जात होते. मंगळवारी झालेल्या बैठकीला देखील धनंजय मुंडे उपस्थित होते. 
मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक, पीए, मुंबईतील वाहन चालक, बीडचे वाहनचालक आणि स्वयंपाकी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोणालाही लक्षणे नाहीत. धनंजय मुंडे या सोमवारी बीडहून मुंबईत परतले असून ते आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नियमितपणे मंत्रालयात जात होते.मुंडे तिसरे मंत्री आहेत ज्यांना कोरानाची लागण झाली आहे. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती, त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget