अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना

वॉशिंग्टन - अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 
जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरात निदर्शनांच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पॅरिस, सिडनी, अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा आणि न्यूझीलंड या देशांमध्ये तर नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आपला निषेध नोंदवला होता.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget