औरंगाबामध्ये आढळले कोरोनाचे ७० रुग्ण

औरंगाबाद - शहरानंतर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. जिह्यात गुरुवारी सकाळी नवे ७० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार १०६ झाली आहे. जिल्ह्यात एकूण १७०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचारादरम्यान १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२३१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
घाटी रुग्णालयात जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद शहरातील बायजीपुरा गल्ली क्रमांक २७ येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत एकूण १२२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १२१ मृत्यू जिल्ह्यातील आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात कटकट गेट येथील ६५ वर्षीय स्त्री आणि श्रीराम नगराजवळील विश्वभारती कॉलनीतील ५६ वर्षीय स्त्री रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ४४ व मिनी घाटीमध्ये एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget