पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन ; भारतीय सैन्याने दहा चौक्या केल्या उद्ध्वस्त

राजौरी - पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे.पाकिस्तानने राजौरी सेक्टरमध्ये तुफान गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर देत मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहा चौक्या उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात राजौरीच्या नौशेरा येथे एक पोलीस जखमी झाले होते. सम्हानी सेक्टरमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात जवानांना यश मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरघोड्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवानांनी केलेल्या कारवाई पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या वर्षीही जवानांनी मोठी कारवाई करत दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले होते त्यामध्ये अनेक दहशतवादी ठार करण्यात आले होते. मागच्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या कुरापती सातत्याने सुरू आहेत.हिंदवाडा पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत ३ जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. लष्कर ए तोएबाच्या तीन दहशतवाद्यांकडून लाखो रुपये, ड्रग्स आणि काही साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. अटक केलेले तीनही दहशतवादी पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. २१ किलो हेरोइन ज्याची बाजारातील सध्याची किंमत १०० कोटी रुपये आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget