सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबद्दल खुलासा

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टच्या माध्यमातून असे समोर येत आहे की, त्याचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला आहे. अंतिम पोस्टमॉर्टम अहवालात पोलिसांना माहिती मिळाली की सुशांतचा मृत्यू फाशीमुळे झाला. ५ डॉक्टरांच्या टीमने या पोस्टमार्टम रिपोर्टचे विश्लेषण केले. या रिपोर्टनंतर पोलिसांचे डोळे व्हिसेरा रिपोर्टकडे लागले होते. आता ते रिपोर्ट देखील समोर आले आहेत. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, सुशांत सिंगच्या शरीरावर संशयास्पद रसायने किंवा विष सापडलेले नाही. सुशांतच्या पोस्टमार्टमनंतर व्हिसेरा जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला होता.सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर आता त्यामागची कारणे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येचे खरे कारण शोधण्यासाठीचा तपासही सुरु केला. ज्यासाठी आतापर्यंत जवळपास २७ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.यशराज फिल्म्सचे कास्टिंग दिग्दर्शकांची देखील चौकशी करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतने अगदी कमी कालावधीत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले. पण १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून त्याने त्याचा प्रवास संपवला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget