शॉपिंग मॉल, जिम सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार - आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई - राज्यात अनलॉक झाला असताना कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. मात्र, लोकल ट्रेन सुरू करण्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक उद्योगांना हळू हळू परवानगी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. पुन्हा जिम आणि शॉपिंग मॉल सुरू कराव्यात का? याबाबत राज्य सरकार विचार करत आहेत. जिम ही जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेची आहे. त्यामुळे यावर विचार केला जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांप्रमाणेच आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्या. एसटीची सेवा कमी पडतेय असे सांगत शेकडो संतप्त प्रवाशांनी बुधवारी नालासोपारा एसटी स्टँडमध्ये जोरदार आंदोलन केले होते.या घटनेवरही राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. लोकल सेवा सुरु करण्याची मागणी अगदीच रास्त आहे. मात्र, ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही, त्यामुळे ट्रेन सुरू करायच्या की नाहीत, याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले आहे.
मुंबईत राबवलेल्या मिशन झिरो प्रकल्पामुळे मुंबईतील रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणेच पुण्यातही मिशन झिरो प्रकल्प राबवणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या कमी करणे, बेडची संख्या वाढवणे, आयसोलेशन करणे, टेस्ट करणे या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट ही प्रणाली तयार केली जाईल. जेणेकरून एका ठिकाणी सर्व माहिती मिळेल, असे ते म्हणाले.:
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget