राजस्थानमध्ये अशोक गहलोत बहुमत सिद्ध करण्याच्या तयारीत

जयपूर - राजस्थानमध्ये गेल्या आठवड्याभरापासून राजकीय हालचालींनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सचिन पायलट यांच्या बंडामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. परंतु, आता मुख्यमंत्री अशोक गहलोत या वादाच्या अंकावर पडदा टाकण्याच्या तयारीत आहे. बुधवारी गहलोत बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत असल्याचे कळते आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गहलोत यांनी मागील शनिवारी संध्याकाळी राज्यपाल कलराज मिश्र यांना भेटून १०३ आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र दिले आहे. परंतु, अद्यापपर्यंत राजभवनाकडून ही फक्त एक सदिच्छा भेट होती, असे सांगण्यात आले आहे. मात्र, राज्यपाल आणि गहलोत यांच्या भेटीमुळे राजस्थानमध्ये वेगवेगळ्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.अशोक गहलोत यांनी राज्यपालांना राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर येत्या बुधवारी विशेष विधानसभा अधिवेशन बोलवण्याची इच्छा बोलून दाखवली, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
बुधवारी विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते आणि यावेळी गहलोत हे बहुमत सिद्ध करतील. गहलोत यांनी आपल्याला १०३ आमदाराचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. यात काँग्रेसचे ८८, बीटीपी ०२, सीपीएम ०२, आरएलडी ०१ आणि ०१ अपक्ष आमदाराचा समावेश आहे.
अशोक गहलोत यांनी बहुमत सिद्ध केले तर राज्य सरकारवर आलेले राजकीय संकट दूर होईल आणि ज्या १९ आमदारांनी बंड पुकारले आहे, त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा मार्गही मोकळा होईल. या आमदारांविरोधात काँग्रेसचे नेते महेश जोशी यांनी व्हिप जारी करून तक्रार केली आहे. तसेच विधानसभा सभापती सीपी जोशी यांनीही या आमदारांना नोटीस बजावली आहे. आता या आमदारांविरोधात सोमवारी कोर्टात सुनावणी होणार आहे. मागील आठवड्यात सभापतींनी दिलेल्या निर्णयावर कोर्टाने स्थगितीही दिली आहे. त्यामुळे सोमवारी कोर्ट काय निर्णय देतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget