उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर खोचक टीका

मुंबई -
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारकीचा फंड पीएमसाठी देऊ केला होता. त्यामुळे ते हल्ली सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करत असल्याची खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरुन सरकारला लक्ष्य करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला.या मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस याच्या अलीकडच्या दिल्ली भेटीविषयी विचारले. त्यावर उद्धव यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस दिल्लीतील कोरोना परिस्थितीची पाहणी करायला गेले असतील. त्यांचा जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करत असल्याचे उद्धव यांनी म्हटले. 
मात्र, फडणवीस दिल्लीत जाऊन काय करताहेत याची मला चिंता नाही. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे तोवर मला चिंता नाही. बाकी फडणवीस हे बोलतच राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही  न जाता, न फिरता एका संस्थेने देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

तसेच राज्य सरकार मुंबईतील कोरोनाची खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही उद्धव ठाकरे यांनी फटकारले. जागतिक आरोग्य संघटना WHO आणि 'वॉशिंग्टन पोस्ट'सारख्या वृत्तपत्रांमध्ये धारावी पॅटर्नचे कौतुक करण्यात आले आहे. तरीही विरोधी पक्षनेते सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप करतात. कदाचित त्यांच्याकडे 'वॉशिंग्टन पोस्ट' वैगेरे येत नसेल. नाहीतर आम्ही 'वॉशिंग्टन पोस्ट'ही मॅनेज केले, अशी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget