सीएसटी येथील इमारत दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू

मुंबई - सीएसटी येथील धोकादायक असलेली भानूशाली इमारत अखेर तडे जाऊन इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील जीपीओ समोरील भानूशाली इमारत काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोसळली. मुंबईतील अतिधोकादायक इमारतीच्या यादीत तिचा समावेश होता. या इमारतीच्या मालकाला पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून पालिकेने परवानगी दिली होती. मात्र मालकाने दुर्लक्ष केल्याने इमारतीचा काही भाग काल कोसळला.या इमारतीत एकूण १८ रहिवासी होते. त्यापैकी १२ जणांना काल अग्निशमन दलाने बाहेर काढले.६ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र आतापर्यंत ९ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जेजे रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून अद्याप शोध मोहीम सुरू असल्याची माहिती मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget